आजची वात्रटिका
---------------------
उलटा न्याय
कोरोनाचा उलटा सुलटा न्याय,
पटला नाही, पटणार नाही.
छोट्या सुट्ट्यांचा मोठा आनंद,
विद्यार्थ्यांना काही वाटणार नाही.
ऑफलाइनसारखी ऑनलाईन,
अभ्यासाशी काही गट्टी होत नाही!
सुट्ट्यांचाही कंटाळा आलय,
पण कोरोना काही सुट्टी घेत नाही!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6232
दैनिक पुण्यनगरी
11ऑगस्ट 2021

No comments:
Post a Comment