Thursday, August 5, 2021

सरड्यांची धाव

आजची वात्रटिका
--------------------

सरड्यांची धाव

समाजकारण आणि राजकारण,
एकमेकास पूरक आहे.
आजचे वास्तव बघितले तर,
परिस्थिती आश्चर्यकारक आहे.

आप-आपल्या राजकारणाला,
समाजकारणाचे नाव आहे !
राजकीय सरड्यांचीसुद्धा,
फकत कुंपणापर्यंतच धाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-7668
दैनिक झुंजार नेता
5ऑगस्ट 2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026