Sunday, August 1, 2021

सजातीय .....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सजातीय

जात जातीला भेटते आहे,
जात जातीला खेटते आहे
जात अगदी जातीने ,
जातीला पुढे रेटते आहे.

जे जातीने व्यापले नाही,
असे शिल्लक काय आहे?
जात आता मागास नाही,
जात आता हायफाय आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7663
दैनिक झुंजार नेता
1 ऑगस्ट 2021

 



No comments:

daily vatratika...3april2025