Monday, August 9, 2021

कोरोनाचे राज्य...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

कोरोनाचे राज्य

कितीही चले जाव म्हटले तरी,
कोरोनाचा जायचा पत्ता नाही.
सत्ताकांक्षी माणसाची,
अजून निसर्गावर सत्ता नाही.

नवनव्या आव्हानांना,
कोरोनासुद्धा सज्ज आहे !!
इंग्रजानंतर सर्व जगावर,
कोरोनाचेच राज्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
फेरफटका-7671
दैनिक झुंजार नेता
9ऑगस्ट 2021

 





No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...