Monday, August 9, 2021

कोरोना आणि कॉकटेल..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

कोरोना आणि कॉकटेल

कोविशिल्ड आहे;कोवॅक्सिन आहे;
लसीपाठोपाठ वेगळी लस आहे.
कोणती लस जास्त परिणामकारक?
याचे उत्तर तरी कुठे ठोस आहे?

जणू कोरोनाच्या भोचकपणापुढे,
आपली विचारशक्तीच फेल आहे ?
जास्त परिणामकारक काय तर म्हणे,
दोन्ही लसींचे कॉकटेल आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6230
दैनिक पुण्यनगरी
9ऑगस्ट 2021

 

No comments:

गोड अपघात...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- गोड अपघात उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये परस्परांवरती मात आहे. कुणाकुणाची उमेदवारी, हा निव्वळ अपघात आहे...