Friday, August 6, 2021

मेख....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

मेख

राज्यपाल पद म्हटले की,
शंकेची पाल
चुकचुकल्यासारखी वाटते.
केंद्राने राज्याच्या अधिकारात,
मेख ठोकल्यासारखी वाटते.

जो वर बसलेला असतो,
तो खाली मेखा ठोकत असतो !
उठता-बसता काड्या करून,
लोकशाहीची शान राखत असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7669
दैनिक झुंजार नेता
6ऑगस्ट 2021

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...