Tuesday, August 3, 2021

कोरोना खुश हुआ

आजची वात्रटिका
---------------------

कोरोना खुश हुआ

काही ठिकाणी निर्बंध उठले,
काही ठिकाणचे निर्बंध उठले नाहीत.
कुणाला निर्णय पटले,
कुणाला मात्र निर्णय पटले नाहीत.

कुणाचा दम कोंडलेला,
कुणा-कुणाचे तर हाश हूश आहे!
आपली वाट मोकळी बघून,
कोरोना तर भलताच खुश आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6224
दैनिक पुण्यनगरी
3ऑगस्ट 2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...