Wednesday, August 25, 2021

अटक महोत्सव..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
अटक महोत्सव
हिरक आणि अमृत नंतर,
अटक महोत्सव रंगला आहे.
लोकशाहीच्या राड्यात तर,
कार्यकर्ता झिंगला आहे.
अटके पार झेंडे लावणारे,
आजी माजी सैनिक आहेत!
लोकशाही धोक्यात असल्याचे,
आरोप तर दैनिक आहेत !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6245
दैनिक पुण्यनगरी
25ऑगस्ट 2021

 

1 comment:

Unknown said...

एकच नंबर

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...