Tuesday, August 10, 2021

रिकामपणाचे उद्योग...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

रिकामपणाचे उद्योग
कुणी करतो टिंगल-टवाळी,
कुणाकडून काड्या केल्या जातात.
कुणी लावतो चहाड्या,
कुणाकडून खोड्या केल्या जातात.

रिकामपणाच्या उद्योगात,
सतत काही ना काही भर असते!
रिकामे डोके कोणाचेही असो,
ते सैतानाचे घर असते!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6231
दैनिक पुण्यनगरी
10ऑगस्ट 2021

 

No comments:

गद्दारीच्या व्याख्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- गद्दारीच्या व्याख्या आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे, या गोष्टी अगदी पक्क्या आहेत. ज्याच्या त्य...