Showing posts with label पाटोदा (बीड). Show all posts
Showing posts with label पाटोदा (बीड). Show all posts

Sunday, August 15, 2021

अमृताचे बोल..मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

--------------------------

अमृताचे बोल
सुवर्ण महोत्सवात घोषणा होती,
मेरा भारत महान आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवतही,
अजून कोरडीच तहान आहे.
मेरा भारत महान होता,
आजही भारत महान आहे,
आणि उद्याही महान असेल !!
भविष्यात लवकरच,
भागलेली तहान असेल!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6236
दैनिक पुण्यनगरी
15ऑगस्ट 2021

Thursday, February 14, 2013

दुष्काळाची जबाबदारी

दुष्काळाची जबाबदारी

पॅकेजवर पॅकेज देऊन
जबाबदारी नाकारता येत नाही.
स्वत:चा धोरनात्मक दुष्काळ
का बरे स्विकारता येत नाही.

बोलाचीच कढी आहे,
बोलाचाच भात आहे !
उद्या कदाचित म्हणतीलही
दुष्काळामागे परदेशी हात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...