Thursday, July 16, 2026

विद्रुप राजकारण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
विद्रुप राजकारण
विश्वासघातकी राजकारणाचा,
आता पार कडेलोट होतो आहे.
कुणीही कुणाला भेटला की,
त्यातून संशयाचा धूर येतो आहे.
संशयाच्या धुरातूनच मग,
अफवांचे ढग वाहू लागतात.
सगळेच मग एकमेकांकडे,
मोठ्या संशयाने पाहू लागतात.
विश्वासघातकी राजकारणाचे,
हे मोठे विद्रूप असे रूप आहे !
जनतेला मात्र धक्के बसत नाहीत,
जनताच तेवढी शॉकप्रूफ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9339
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
16 जुलै 2026

 

No comments:

विद्रुप राजकारण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- विद्रुप राजकारण विश्वासघातकी राजकारणाचा, आता पार कडेलोट होतो आहे. कुणीही कुणाला भेटला की, त्यातून संशयाच...