Saturday, July 4, 2026

लोहगड ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
लोहगड
चॅनलवाल्यांनी ब्रेकिंग न्यूजचा,
धडाक्यावर धडाका लावला आहे.
इतिहासापेक्षाही वर्तमानात,
लोहगड प्रसिद्धीस पावला आहे.
कदाचित तुम्हाला वाटू शकते,
आमचा कल्पनाविस्तार अति आहे.
प्री-वेडिंग शूटवाल्यांनो सावधान,
तुमचे भविष्य तुमच्या हाती आहे.
विश्वासघात आणि गद्दारीकडे,
आमचा सरळ सरळ रोख आहे!
इतिहासात नवीन नोंद,
लोहगडावरतीही टकमक टोक आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9327
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
4 जुलै 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 3जुलै 2026वर्ष- सहावे अंक - 21 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...