आजची वात्रटिका
--------------------
विकास दर्शन
सगळीकडून ओहोटी,
एकीकडेच भरती आहे.
सगळ्याच बंडखोरांकडून,
सत्तेचीच आरती आहे.
सत्तेच्या आरतीला,
विकासाचाच जप आहे.
खपाखप खपतो म्हणून,
विकासाचाच खप आहे.
विकासाच्या खपवाखपवीत,
सगळ्यांचीच बाजी आहे !
भुलवत रहा;झुलवत रहा,
जनता कशालाही राजी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9331
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
8 जुलै 2026

No comments:
Post a Comment