आजची वात्रटिका
--------------------
स्थिर अस्थिर
रोज नवे राजकीय समीकरण,
रोज नवे उलटे उलटे फासे आहेत.
कुणालाच अंदाज येत नाही,
नेमके राजकीय वारे कसे आहेत?
कधी हा त्याच्या दारात आहे,
कधी तो याच्या दारात आहे.
वावड्या आणि अफवांची तर,
बदलत्या वाऱ्यावरची वरात आहे.
भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर,
राजकीय भविष्य खुणवत आहे!
राजकीय स्थिरतेमध्येही,
राजकीय अस्थिरता जाणवत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9340
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
17 जुलै 2026

No comments:
Post a Comment