आजची वात्रटिका
--------------------
बंडखोरीची खिचडी
पिसाळ बोला;खोपडे बोला,
बंडखोरांची हौस पुरली नाही.
बंडखोरी एवढी वाढली की,
तिला आता उपमाही उरली नाही.
उपमा उरल्या नाही म्हटल्यावर,
बंडखोऱ्या तरी रोधाव्या लागतील.
नसता नव्या बंडखोरांसाठी,
नव्या उपमा शोधाव्या लागतील.
कुणाची राजकीय जखम कोरडी,
कुणाची राजकीय जखम ओली आहे!
बंडखोरीला उपमा नसली तरी,
बंडखोरीचीही खिचडी झाली आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9325
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
2 जुलै 2026

No comments:
Post a Comment