आजची वात्रटिका
--------------------
बंधन तुटले रे
ज्याला येतो सत्तेचा वास,
तो विरोधात टिकूच शकत नाही.
ज्याचा स्वतःवरच ताबा नाही,
त्याला बंधन रोखूच शकत नाही.
बंधन पायात असो वा हातात,
बंधन तुटलेलेही कळत नाही.
आमदारबरोबर खासदारही,
कुणाला फुटलेलेही कळत नाही.
बंधन बंधन राहिलेच नाही,
बंधन केवळ हातावरचा धागा आहे !
ऑपरेशन चालूच असल्याने,
संशयाला खूप मोठी जागा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9324
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 जुलै 2026

No comments:
Post a Comment