आजची वात्रटिका
--------------------
नो गॅरंटी
मतपेटी आणि दानपेटी,
दोन्हीही आता धोक्यात आहेत.
शंका आणि कुशंका,
सामान्य जनतेच्या डोक्यात आहेत.
मतपेटीपासून दानपेटीपर्यंत,
सगळीकडेच चोऱ्या आहेत.
जे जे झाले चोरावर मोर,
त्यांच्याकडूनही शिरजोऱ्या आहेत.
जणू दानाबरोबर मतदानही,
आज-काल सत्पात्री जात नाही !
लोकविश्वासाची उडाली दाणादाण ,
कुणीच कुणाची गॅरंटी देत नाही!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9337
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
14 जुलै 2026

No comments:
Post a Comment