Friday, July 10, 2026

स्टंटबाजीचा शाप...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
स्टंटबाजीचा शाप
सामाजिक आंदोलनांना,
व्हायरल होण्याची नशा आहे.
आंदोलनाचा मूळ मुद्दा हरवू नये.
किमान एवढी तरी आशा आहे.
हल्ली आंदोलनाच्या बाबतीत,
पुन्हा पुन्हा हेच घडते आहे.
जणू कॅमेऱ्याचीच नजर,
हल्ली आंदोलनांना नडते आहे.
लाईक कॉमेंट्स आणि शेअर,
आंदोलनांचे नवे मोजमाप आहे!
आंदोलक प्रामाणिक असले तरी,
त्यांना स्टंटबाजीचा शाप आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9333
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
10 जुलै 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...