Monday, July 6, 2026

धाडसत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

धाडसत्र

टपरीवरचा गुटखा गायब,
भेसळीची सारी उठाठेव गेली.
सगळ्या खवय्यांची पंचाईत,
पाणीपुरीची खरी चव गेली.

प्रसादालाही बसला प्रसाद,
मिठाईचेही रंग उडून गेले.
धाड धाड पडल्या धाडी,
त्यामुळेच सगळे घडून गेले.

औषधांचेही मेडिकल झाले,
सगळी भेसळ गॅंग कोमात आहे!
इच्छा शक्तीचा विजय असो,
त्यामुळेच धाडसत्र जोमात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9329
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
6 जुलै 2026
 

No comments:

तिसऱ्या लग्नाची गोष्ट ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- तिसऱ्या लग्नाची गोष्ट पहिल्या नाही; दुसऱ्या नाही, ही तिसऱ्या लग्नाची गोष्ट आहे. खानदान अमीर असल्याने, सग...