Thursday, July 30, 2026

कानफुके ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
कानफुके
अन्याय अत्याचार सोसूनही,
बिचारे शिष्य मुके आहेत.
शिष्य कच्च्या कानाचे असल्याने,
त्यांचे गुरुही कानफुके आहेत.
कच्च्या कानाच्या शिष्यामुळेच,
कान फुक्यांचे धंदे जोरात आहेत.
रोज नव्या शिष्यांचे लोंढे,
कानफुक्यांच्या दारात आहेत.
कान फुकाफुकीच्या कार्यक्रमात,
गुरु आणि शिष्य बिझी आहेत!
तुम्ही आम्ही बोलणार कोण?
जिथे गुरुला शिष्यच राजी आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9353
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
30जुलै 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...