Friday, July 31, 2026

विकासाचे वास्तव ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
विकासाचे वास्तव
सत्ताधाऱ्यांचा दावा असतो,
सर्वत्र विकासच विकास आहे.
विरोधकांच्या दावा असतो,
सर्वत्र भकासच भकास आहे.
ज्याच्या त्याच्या विकासाचे मार्ग,
ज्याला त्याला पक्के ठावे असतात.
बारा महिने तेरा त्रिकाळ,
त्यांचे परस्पर विरोधी दावे असतात.
कुरघोडीच्या राजकारणामध्ये,
जनतेचा विकास कायम बाधला जातो !
वैयक्तिक विकास मात्र,
संधी कशी मिळेल तसा साधला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9351
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
31जुलै 2026

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...