Sunday, July 26, 2026

आंदोलन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
आंदोलन
किरकोळ किरकोळ म्हटले तरी,
त्याला गांभीर्याने घ्यावे लागते.
कितीही निर्भयतेने हाताळले तरी,
त्याला आतून मात्र भ्यावे लागते.
आंदोलन उभे राहावे म्हणून,
माल मसाले पुरवले जातात.
लढाईत जिंकलेली आंदोलने,
तहात मात्र नक्की हरवले जातात.
जिंकले काय? हारले काय ?
आंदोलने उभी राहिली जातात!
भविष्याची नवी स्वप्ने,
प्रत्येक आंदोनातून पाहिली जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9348
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25 जुलै 2026

 

No comments:

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...