Monday, July 13, 2026

सामाजिक अनास्था ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका.

आजची वात्रटिका
--------------------
सामाजिक अनास्था
गणवेशापासून भोजनापर्यंत,
सगळे काही फुकट आहे.
तरी सरकारी शाळांची वाट ,
दिवसेंदिवस बिकट आहे.
फुकटच्यापेक्षा विकतच्याचा,
जनमानसावर प्रभाव आहे.
सरकारी शाळांची बदनामी,
म्हणे गुणवत्तेचा अभाव आहे.
बदनामीच्या डावपेचांना,
पूरक असे धोरण आहे!
सामाजिक अनास्थेमुळे,
सरकारी शाळांचे मरण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9336
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
13 जुलै 2026

 

No comments:

सामाजिक अनास्था ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका.

आजची वात्रटिका -------------------- सामाजिक अनास्था गणवेशापासून भोजनापर्यंत, सगळे काही फुकट आहे. तरी सरकारी शाळांची वाट , दिवसेंदिवस बिकट आह...