आजची वात्रटिका
--------------------
कळतंय पण..
त्यांनी यांना सोलले आहे,
यांनी त्यांना सोलले आहे.
प्रत्येकाचाच दावा आहे,
आमचे आरक्षण खाल्ले आहे.
आरक्षणाच्या खाल्ल्या मीठाला,
म्हणे तसे कुणीच जागले नाही.
आरक्षणाची जशी अपेक्षा होती,
म्हणे तसे कुणीच वागले नाही.
ज्यांना ज्यांना मिळाले,
त्यांना त्यांना वळाले पाहिजे !
कोण कशी आग लावतोय?
ज्यांना त्यांना कळाले पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9328
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
5 जुलै 2026

No comments:
Post a Comment