आजची वात्रटिका
--------------------
विद्यार्थी आंदोलन
कुणी हिरोचे झिरो झाले,
कुणी झिरोचे हिरो झाले.
कुणाच्या रुंदावल्या कक्षा,
कुणी जास्तच नॅरो झाले.
कुणी उपाशी,कुणी तपाशी,
कुणी कॅमेऱ्यापुढे दंग होते.
सोशल मीडियामध्ये तर,
ज्याचे त्याचे वेगळे रंग होते.
अनेकांचे चुकले अंदाज,
कुणाच्या अंदाजांचा डंका आहे!
उद्दिष्ट साध्य होऊनही,
प्रत्येकाच्या मनात शंका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9350
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
27जुलै 2026

No comments:
Post a Comment