Friday, July 3, 2026

नवे कोलीत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
नवे कोलीत
जात जातीला भांडू लागली,
जात जातीला तंडू लागली.
उरला सुरला सगळा हिशोब,
जात रस्त्यावर मांडू लागली.
जात जातीला रेटू लागली,
एकमेकांना कोंडीत गाठू लागली.
आपआपली श्रेष्ठता मिरवीत,
जात उगीचच नटू लागली.
जात जातीला कोलीत आहे,
जात जातीला सोलीत आहे !
जुना हिशोब संपत नाही तोपर्यंत,
जातीच्या हाती नवे कोलीत आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9326
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
3 जुलै 2026

 

No comments:

नवे कोलीत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- नवे कोलीत जात जातीला भांडू लागली, जात जातीला तंडू लागली. उरला सुरला सगळा हिशोब, जात रस्त्यावर मांडू लागल...