Friday, July 24, 2026

सत्तेचे दुर्गुण .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
सत्तेचे दुर्गुण
उपकाराची फेड अपकाराने,
जनता नेहमी भोगत असते.
सत्ता कुणाचीही असली तरी,
सत्ता सत्तेसारखी वागत असते.
आपणही कधी विरोधक होतो,
सत्ता सोयीस्कर विसरली जाते.
सत्ता आंधळी बनली की,
सत्ता मस्तीमध्ये घसरली जाते.
एकदा सत्तेवर बसले की,
सत्तेला भूतकाळ आठवत नाही!
वैचारिक आणीबाणी करून,
आम्ही काही अफवा उठवत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9347
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
24 जुलै 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 23जुलै 2026वर्ष- सहावे अंक - 31 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...