Thursday, July 9, 2026

अंदाज पावसाचा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
अंदाज पावसाचा
कुठे मुसळधार;कुठे कोसळघार
पाऊस सैराट होऊन धडकतो आहे.
ज्याने सांगितले उलट सुलट अंदाज,
जणू पाऊस त्यालाच हुडकतो आहे.
शास्त्रीय आशास्त्रीय अंदाजाविरुद्ध,
आजकाल पावसाचा द्रोह आहे.
जिथे काल जांभळांचा खच होता,
तिथेच आज महापुराचा डोह आहे.
कुणी मारल्या ढगात गोळ्या,
कुणी म्हणाले क्लायमेट चेंज आहे!
ज्यांनी सांगितले पावसाचे अंदाज,
सिद्ध झाले त्यांची काय रेंज आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9332
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
9 जुलै 2026

 

No comments:

अंदाज पावसाचा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- अंदाज पावसाचा कुठे मुसळधार;कुठे कोसळघार पाऊस सैराट होऊन धडकतो आहे. ज्याने सांगितले उलट सुलट अंदाज, जणू प...