Tuesday, July 7, 2026

तिसऱ्या लग्नाची गोष्ट ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
तिसऱ्या लग्नाची गोष्ट
पहिल्या नाही; दुसऱ्या नाही,
ही तिसऱ्या लग्नाची गोष्ट आहे.
खानदान अमीर असल्याने,
सगळे सहज सोपे स्पष्ट आहे.
कुणाला साधी एक मिळेना,
त्यांच्यासाठी बायकांचे दुर्भिक्ष आहे.
इथे मात्र तिसऱ्या लग्नाला,
पहिल्या दोघींचीही साक्ष आहे.
जो करील; तो भरील,
आपल्याला काय देणे घेणे आहे?
कुणाचे बाशिंगबळ कितीही असो,
आपले किमान एक तरी होणे आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9330
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
7 जुलै 2026

 

No comments:

तिसऱ्या लग्नाची गोष्ट ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- तिसऱ्या लग्नाची गोष्ट पहिल्या नाही; दुसऱ्या नाही, ही तिसऱ्या लग्नाची गोष्ट आहे. खानदान अमीर असल्याने, सग...