Sunday, July 12, 2026

पाताळयंत्री ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
पाताळयंत्री
एकाचा खांदा; दुसऱ्याची बंदूक,
असे राजकारण साधले जाते.
सहजासहजी ओळखू येणार नाही,
असे राजकारण बाधले जाते.
एकदा राजकीय बाधा झाली की,
भावना बिवना बधिर होत जातात.
विष पेरणीचा परिणाम बघायला,
कर्ते करविते अधीर होत जातात.
इच्छा असली आणि नसली तरी,
लोकांना बरोबर बाध्य केले जाते !
गाव जले हनुमान बाहर,
आपले उद्दिष्ट साध्य केले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9335
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
12 जुलै 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...