Thursday, December 7, 2023

चहापानाची पानसुपारी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

चहापानाची पानसुपारी

भारतीय लोकशाहीच्या वाट्याला,
लोकशाही परंपरांचा फेरा आहे.
जशी चहापान अधिवेशनाची परंपरा,
तशी बहिष्कारसुद्धा परंपरा आहे.

जसे सत्ताधारी आणि विरोधकही,
लोकशाही परंपरांचे पाईक असतात.
तसे सत्ताधारी आणि विरोधकही,
अगदी सारखेच तऱ्हेवाईक असतात.

आम्हीच खरे लोकशाहीवादी,
अशी ज्याची त्याची फपारी आहे !
आजची चहापानाची परंपरा,
भविष्यात म्हणे 'पान- सुपारी' आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8413
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
8डिसेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 185 वा

दैनिक वात्रटिका l 4 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 185 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Elm-bAY7vNSQzSIn_iX...