Wednesday, December 6, 2023

कार्यकर्त्यांची कुचंबणा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------


कार्यकर्त्यांची कुचंबणा


कालचे विरोध;कालची दुश्मनी,
सारे सारे अचानक फेक झाले.
कार्यकर्त्यांना भिडले कार्यकर्ते,
अन् ते सारे अचानक एक झाले.

आपण येडे की खुळे?
कार्यकर्त्यांना सतत कोडे पडते आहे.
अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत,
सगळीकडेच हेच घडते आहे.

कुणी कुणाचे करावे सांत्वन?
सामान्य कार्यकर्त्यांकपुढे पेच आहेत!
राजकीय एकी आणि बेकीतही,
बळीचे बकरे तर तेच आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8412
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6डिसेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 185 वा

दैनिक वात्रटिका l 4 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 185 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Elm-bAY7vNSQzSIn_iX...