Sunday, December 3, 2023

किमान अपेक्षा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

किमान अपेक्षा

खऱ्या खोट्या पुराव्यांसोबत,
आरोपांचाही थरथराट आहे,
वरचेवर लांबत चाललेले,
आमदार अपात्रतेचे चऱ्हाट आहे.

संविधानाची आब राखा,
असत्याची बाजूही घेऊ नका !
किमान पुढची पंचवार्षिक तरी,
निकाला आधी येऊ देऊ नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8410
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
3डिसेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...