आजची वात्रटिका
-------------------------
निर्वात पोकळी
काळ कुणाला घेऊन गेला की,
त्याच्या नावाची पोकळी असते.
पुढच्या कुणासाठी तरी,
त्याचीच जागा मोकळी असते.
ही पोकळी साधीसुधी नाही,
ही पोकळी तर निर्वात असते.
ही निर्वात पोकळीच,
कुणाची तरी वाट पाहत असते.
काळाच्याही कसोटीवर उतरेल,
असा कुणीतरी लायक असतो !
जो भरतो निर्वात पोकळी,
तोच त्या युगाचा नायक असतो !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8412
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
5डिसेंबर2023
No comments:
Post a Comment