Monday, December 4, 2023

ईव्हीएमच्या नावानं...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
ईव्हीएमच्या नावानं...
जशी सबळ पुराव्याशिवाय,
कोणतीच गोष्ट खरी होत नाही.
तशी निवडणूक निकालांची चर्चा,
ईव्हीएम शिवाय पुरी होत नाही.
ईव्हीएम जिंदाबाद...!
जसा जिंकणाऱ्यांचा नारा असतो.
तसा ईव्हीएम मुर्दाबाद...!
पडलेल्यांचा चढता पारा असतो.
उलट्या सुलट्या प्रतिक्रियांचा,
तुम्हाला आम्हाला धक्का असतो !
पराभवाचे खापर फोडायला,
ईव्हीएम हुकमाचा एक्का असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8411
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4डिसेंबर2023

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 185 वा

दैनिक वात्रटिका l 4 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 185 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Elm-bAY7vNSQzSIn_iX...