आजची वात्रटिका
-------------------------
ओव्या आणि शिव्या
काही शब्द एकाने वापरले की,
त्याच्या चक्क ओव्या होतात.
तेच शब्द दुसऱ्याने वापरले की,
त्याच्या चक्क शिव्या होतात.
शिव्या आणि ओव्या मध्ये,
राजकीय व्यक्तिसापेक्षता आहे.
तरीही शब्द जपून वापरावेत,
याची कधी कुठे दक्षता आहे ?
म्हणूनच शिव्या आणि ओव्या
मोकळ्या मनाने उधळत आहेत !
ओव्या कम शिव्या ऐकून,
तेच मोठमोठ्याने खिदळत आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8408
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
1 डिसेंबर2023
No comments:
Post a Comment