आजची वात्रटिका
-------------------------
निलंबनास्त्र
आपल्या संसदेच्या सुरक्षेवर,
घुसखोरांनी प्रश्नचिन्ह लावले आहे.
घुसखोरांच्या घुसखोरीने,
खासदारांना बाहेर हुसकावले आहे.
घुसखोरी आणि हुसकावणी,
याच्यामध्येच ग्यानबाची मेख आहे.
खासदारांच्या निलंबनाची घटना,
ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक आहे.
कशात काय ? फाटक्यात पाय,
इथे दोघांमध्ये तिसरा आहे !
जणू खासदारांच्या मुस्कटदाबीसाठी,
निलंबनास्त्राचा आसरा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8426
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20डिसेंबर2023
No comments:
Post a Comment