Monday, February 26, 2024

धोक्याचे वळण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

धोक्याचे वळण

आरोपावर प्रतिआरोप आहेत,
बढाया वर बढाया आहेत.
कालच्या सामाजिक लढाया,
आज वैयक्तिक लढाया आहेत.

समाजकारणात राजकारण,
त्यामुळेच सगळा पचका आहे.
जुळत आलेल्या गोष्टींचा,
अचानकपणे विचका आहे.

संयम आणि अतिरेक,
यांच्याही मर्यादा पार आहेत !
अगदी छातीठोकपणे,
आता कमरेखाली वार आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8487
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26फेब्रुवारी 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 202 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 202 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1RS7Ouagfi-rb0Ven1d...