Saturday, February 17, 2024

आभाळाएवढे समाधान...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आभाळाएवढे समाधान

सारी दुनियाच भ्रष्ट आहे,
असे म्हणणे नकारात्मक वाटते.
भ्रष्टाचाराला व्यवहार म्हणा,
असे म्हणणे सकारात्मक वाटते.

प्रश्न मग एवढाच उरतो,
तुम्ही देणारे की घेणारे आहात?
जसे वारे तसे उफणावे,
असे शरणागत होणारे आहात ?

आकाशाला ठिगळ लावताना,
लावणाऱ्याचीही फाटू शकते !
ठिगळ लावायचा प्रयत्न केला,
हे लढाऊ समाधान मिळू शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8478
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17फेब्रुवारी 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 202 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 202 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1RS7Ouagfi-rb0Ven1d...