Thursday, February 29, 2024

गॅरंटीची भाषा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गॅरंटीची भाषा

आश्वासने आणि जाहीरनाम्यानंतर,
आता तर गॅरंटीची भाषा आहे.
आपल्याच वरातीला,
आपलाच बेंडबाजा अन ताशा आहे.

जसे हाकारेही आपलेच आहेत,
तसे पुकारेही आपलेच आहेत.
आता गॅरंटी वॉरंटीही खपेल,
यापूर्वी हे फंडे खपलेच आहेत.

बदलत्या आणि नव्या काळाच्या
बदलत्या प्रचार भाषा आहेत !
बदलत चाललेल्या लोकशाहीमध्ये,
दुसऱ्या कोणत्या आशा आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8490
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29फेब्रुवारी 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...