आजची वात्रटिका
-------------------------
इज्जत का सवाल
गोळी म्हणाली बंदूकीला,
तुझ्या हाती माझा चाप आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेला,
नेमका तुझा माझाच शाप आहे.
गुंडा - पुंडांच्या हातात,
तुझी माझी खेळणी आहे.
ज्यांनी आपली बाजू घ्यायची,
त्यांच्या तोंडात गुळणी आहे.
जणू स्वसंरक्षणाच्या ऐवजी,
थेट मारायचीच मुभा आहे !
आपल्याच इज्जतीचा प्रश्न,
आपल्या समोरच उभा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8472
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9फेब्रुवारी 2024
No comments:
Post a Comment