Wednesday, February 28, 2024

मास्टर माईंड...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मास्टर माईंड

जे बनतात हातचे बाहुले,
ते मेंदूने ब्लाइंड असतात.
कर्ते वेगळे दिसले तरी,
मागे मास्टर माईंड असतात.

मास्टर माईंडच्या हाती,
बाहुल्यांची चावी असते.
बाहुल्यांनासुद्धा ही गोष्ट,
अगदी पक्की ठावी असते.

आपल्या हातच्या बाहुल्यांना,
वापरले आणि ढोपरले जाते !
एका बाहुल्याचा बळी गेला की,
दुसरे बाहुले वापरले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8489
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28फेब्रुवारी 2024
 

No comments:

फूट आणि विलीनीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- फूट आणि विलीनीकरण फुटीनंतर विलीनीकरण असते, विलीनीकरणानंतर फूट असते. तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत,...