Monday, February 19, 2024

गुंडांचे मनसुबे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
गुंडांचे मनसुबे
राजकीय पक्षात जाण्यापेक्षा,
आपण आपलाच पक्ष काढू.
उघड उघड आपण लढतोच,
नंतर लपून-छपून ल लढू.
ते आपल्यामुळे जिंकतात,
आपण सहज जिंकू शकतो.
आपल्या उपद्रवमूल्यावरती,
कशाला कोण शंकू शकतो ?
इतरांप्रमाणे आपल्यावरही,
लोकशाही कशी हसेल?
बंदूक, सुरा किंवा हातकडी,
हाच आपलं सिम्बॉल असेल !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8480
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19फेब्रुवारी 2024

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 202 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 202 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1RS7Ouagfi-rb0Ven1d...