आजची वात्रटिका
-------------------------
पॉलिटिकल मॅजिक
कालच्या घोटाळे बहाद्दरांना,
एका फटक्यात क्लीन चीट आहे.
घोटाळे बहाद्दरांइतकाच,
त्यांना क्लीन देणाऱ्यांचा वीट आहे.
काल ज्यांनी काढले धिंडवडे,
आज त्यांच्याच तोंडी आरती आहे.
काल ज्यांची निंदा नालस्ती होती,
त्यांचीच आज मोठी कीर्ती आहे.
काल गळे काढणाऱ्यांचेच,
आज गळ्यामध्ये गळे आहेत !
त्यांनी केलेल्या पापांची,
जनतेच्या पदरात फळे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8476
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15फेब्रुवारी 2024
No comments:
Post a Comment