आजची वात्रटिका
-------------------------
' हात ' तिच्या आयला !
चौकशी यंत्रणांच्या दबावापुढे,
भल्या भल्यांची निष्ठा ढळती आहे.
सत्तेच्या राजकीय उन्हाळ्यात,
अखेर 'अशोका'ला सुद्धा गळती आहे.
अशोक पर्वाच्या इतिहासाला,
पेड न्यूजचा काळा डाग आहे.
आदर्श घोटाळ्याच्या भुताचा,
चोख बंदोबस्त करणे भाग आहे.
काँग्रेस सोडण्याचा निर्णय काही,
अजिबात 'हात' घाईचा वाटत नाही !
कुठलेच कारण नसल्याचे,
प्रतिपादन अजिबातच पटत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8475
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13फेब्रुवारी 2024
No comments:
Post a Comment