Friday, February 16, 2024

निष्ठावंत हटाव....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

निष्ठावंत हटाव

निष्ठावंत कार्यकर्त्यांची,
झिजून झिजून हयात गेली.
त्यांच्याच नाकावर टिच्चून,
नेतेमंडळी आयात केली.

आयातीच्या मालाला,
नको तेवढा उठाव आहे.
राजकीय व्यवहाराचे नाव,
निष्ठावंत हटाव आहे.

लाज,लज्जा,शरम,अब्रू,
असले काही कुणाला आहे?
आज निष्ठावांतांची निष्ठा,
सगळीकडेच पणाला आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8477
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16फेब्रुवारी 2024
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...