आजची वात्रटिका
-------------------------
निर्णयाची कॉपी-पेस्ट
काकाकडची पक्षीय सूत्र,
पुतण्याकडे सोपविण्यात आली.
निकालाची कारण मीमांसा,
मेरीटवरती खपविण्यात आली.
महाराष्ट्राच्या राजकारणात,
म्हणे नवा ट्विस्ट आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा निर्णय,
शिवसेनेची कॉपी पेस्ट झाला आहे.
ज्यांच्या हाती मास्टर चावी आहे,
ते काहीही करवू शकतात !
अगदी घड्याळाचे काटे सुद्धा,
उलटे सुलटे फिरवू शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8470
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7फेब्रुवारी 2024

No comments:
Post a Comment