Tuesday, February 27, 2024

मराठी भाषा समृद्धी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मराठी भाषा समृद्धी

आजकाल राजकारण्यांमुळे तरी,
मराठी भाषा समृद्ध होऊ लागली.
मराठी भाषेची प्रत्येक बोली,
आजकाल ऐकायला येऊ लागली.

दर दहा कोसाला जशी भाषा बदलते,
तशी नेत्याप्रमाणेभाषा बदलू लागली.
जो लावतो जसा ताव,
तशी भाषेचीही नशा बदलू लागली.

जसे काय राजकीय नेत्यांकडे,
मराठी भाषा समृद्धीचे गुत्ते आहे !
साहित्य संमेलनातून मिरवल्याने,
त्यांचे काम शंभर टक्के फत्ते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8488
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27फेब्रुवारी 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...