Tuesday, May 28, 2024

पुत्र व्हावा ऐसा गुंडा..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पुत्र व्हावा ऐसा गुंडा

कायदा,सुव्यवस्था,आरोग्य,
सर्व व्यवस्थांचा वाजवावा गंडा.
अगदी अल्पवयातच,
ज्याने त्रिलोकी लावावा झेंडा.

पळवावी कार; चिरडावेत लोक,
आजमावावा रॅप गाण्याचा फंडा.
असावा निर्दयी आणि निर्ढावलेला,
ज्याला लाजावा प्रत्यक्ष गेंडा.

बाप आणि आजोबाबरोबर,
घरादाराचा लावावा कडी- कोंडा !
उद्या प्रत्येक बिल्डर म्हणेल,
पुत्र व्हावा ऐसा गुंडा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8575
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28मे2024
 

No comments:

DAILY VATRATIKA...15MARCH2025