आजची वात्रटिका
--------------------------
महागाईचे परिणाम
दहा पाच रुपयात होणारे काम,
आता हजारात व्हायला लागले.
वाढत्या भ्रष्टाचारामुळे तरी,
हे सगळे लक्षात यायला लागले.
पूर्वी हजारात नेते फुटायचे,
आता खोक्याशिवाय फुटत नाहीत.
वाढत्या महागाईचे चटके,
त्याशिवाय खरे वाटत नाही.
महागाईच्या वाढत्या शब्दाला,
प्रत्येक जण जागतो आहे !
शेकड्यात विकणारा मतदार,
हजारांचा भाव मागतो आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8560
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12मे2024
No comments:
Post a Comment